- 2 इंचाचा संपूर्ण एचडी डिस्प्ले (1080x1920 पिक्सेल रिझॉल्युशन)
- क्वालकॉम हेक्सा-कोर स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसर
- 3 जीबी रॅम
- 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज (मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट नाही)
- फिंगरप्रिंट सेन्सर
- 2680 mAh क्षमतेची बॅटरी
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- सिंगल सिम
- एलटीआय
- 3 जी
- वाय फाय
- अँड्रॉईड मार्शमॅलो 6.0 ऑपरेटिंग सिस्टम
नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोनचा आकर्षक कलर व्हेरिएंट भारतात लॉन्च
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2016 02:23 AM (IST)
मुंबई : नेक्स्टबिटने आपल्या रॉबिन स्मार्टफोनचा लिमिटेड एडिशन एंबर कलर व्हेरिएंट अखेर भारतात लॉन्च केला आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 19 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. फ्लिपकार्टसोबतच नेक्स्टबिट डॉट कॉमवरुनही खरेदी करता येणार आहे. नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोनच्या लिमिटेड एडिशन व्हेरिएंटमध्ये रिअर ब्लॅक कलर असून, ब्राईट रेड आणि कॅप्ससोबत देण्यात आला आहे. मिंट आणि मिडनाईट कलरनंतर आता एंबर हा या स्मार्टफोनचा तिसरा कलर व्हेरिएंट आहे. कंपनीच्या माहितीनुसार, एंबर कलर व्हेरिएंट स्मार्टफोनची निर्मिती मर्यादित आहे. काही दिवसांपूर्वीच नेक्स्टबिटने रॉबिन स्मार्टफोनवर 5 हजार रुपयांची सवलत देऊन विक्री केली होती. आता पुन्हा एकदा हा स्मार्टफोन आपल्या मूळ किंमतीत विक्रीसाठी सज्ज झाला असून, फ्लिपकार्टवर मात्र एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवरील एक्सचेंज ऑफरनुसार ग्राहकांना 15 हजार रुपयांच्या सवलतीत रॉबिन स्मार्टफोन खरेदी करता येऊ शकतो. नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोनचे फीचर्स :