मुंबई: वारंवार मोबाइल फोन बदलणं किंवा फोन खराब का होतात याबाबतची माहिती नुकतीच एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. सेल्फी काढताना अनेकदा मोबाइल पडतात त्यामुळे एकतर स्क्रिन खराब होते अथवा तुटते. त्यामुळेच नवे स्मार्टफोन खरेदी केले जातात.
एका नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार 50 टक्क्यांहून अधिक लोकांकडून स्मार्टफोनच्या खरेदीनंतर आठ महिन्यात स्क्रिन खराब होतात अथवा तुटतात.
सर्वेक्षणात मागील एक वर्षात दुरुस्तीसाठी आलेल्या 4000 हून अधिक स्मार्टफोनच्या खराब होण्याची कारणं शोधली गेली. हे सर्वेक्षण गॅजेट अॅण्ड इलेट्रॉनिक्स सुरक्षा कंपनी 'ऑनसाइटगो'द्वारे करण्यात आलं.
सर्वेक्षणानुसार, सेल्फी घेताना फोन खाली पडून सर्वाधिक फोन खराब झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये 58 टक्के महिलांचे मोबाइल असल्याचं समजतं. त्यामुळेच महिला बऱ्याचदा मोबाइल बदलतात.
ऑनसाइटगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणा महिपाल यांचं म्हणणं आहे की, 'जर लोकांनासमजविण्यात आलं की, मोबाइल फोन कोणत्या स्थितीत खराब होऊ शकतो. तर अशावेळी लोकं नक्कीच काळजी घेतील.'