वॉशिंग्टन/मुंबई: इंटरनेट कंपनी याहूनं यूजर्सचा डेटा हॅक झाल्याची माहिती दिली आहे. याहूचा दावा आहे की, 'स्टेट स्पॉन्सर्ड अॅक्टर'नं 2014 साली कंपनीच्या नेटवर्कमधून 50 कोटी यूजर्सचा डेटा अॅक्सेस केला होता.

याहूच्या मते, यूजर्सच्या अकाउंटमधून डेटा चोरी झाला आहे. ज्यामध्ये त्याचं नाव, इमेल आयडी, जन्मदिवस, टेलिफोन नंबर, पासवर्ड आणि इंक्रीप्टेड किंवा अन् इंक्रीप्टेड सिक्युरिटी प्रश्न-उत्तरं याचा समावेश असू शकतो.

याहूनं दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे की, या मोठ्या हॅकला बळी पडलेल्या यूजर्सला याची माहिती देण्यात आली आहे. तसेच आम्ही देखील सुरक्षेसाठी मोठी पावलं उचलली आहेत. आम्ही यूजर्सच्या अन इंक्रीप्टेड प्रश्नांची व्हॅलिडिटी संपवून टाकली आहे. ज्यामुळे हॅकर्स अकाउंट अॅक्सेस करु शकणार नाही.

50 कोटी यूजर्सचा डेटा लीक होणारं हे जगातील सर्वात मोठं सिक्युरिटी हॅक आहे.

पासवर्ड बदलण्याचं आवाहन:

याहूनं सर्व यूजर्संना आपला पासवर्ड बदलण्याचं आवाहन केले आहे. तसेच सिक्युरिटी प्रश्न-उत्तरंही बदलण्याचं अपील केलं आहे.

प्रकरणाची चौकशी सुरु:

या हॅकिंग प्रकरणी चौकशी सुरु आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, हॅकिंगमध्ये बँक डिटेल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांची माहिती हॅक झालेली नाही.