लेनोव्होचा K6 पॉवर 29 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होणार
एबीपी माझा वेब टीम | 26 Nov 2016 10:47 AM (IST)
मुंबई : स्मार्टफोन कंपनी लेनोव्हो आपला K6 पॉवर 29 नोव्हेंबरला भारतात लॉन्च करणार आहे. लॉन्च झाल्यावर लगेचच हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला जाईल. दिल्लीतील एका कार्यक्रमात 29 नोव्हेंबरला हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येईल. यापूर्वी बर्लिनमध्ये आयोजित आयईएफए 2016 ट्रेड शोमध्ये K6 आणि K6 नोट लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन डार्क ग्रे, गोल्ड आणि सिल्व्हर कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. K6 पॉवरचे फिचर्स: ऑपरेटिंग सिस्टीम : अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो रॅम : 2जीबी आणि 3 जीबी दोन व्हेरिएंट डिस्प्ले : 5.5 इंच फुल एचडी डिस्प्ले प्रोसेसर : स्नॅपड्रॅगन 430 ऑक्टा कोअर प्रोसेसर ग्राफिक्स : अँड्रेनो 505 जीपीयू मेमरी : 16 जीबी आणि 32 जीबी बॅटरी : 4000mAh कॅमेरा : 13 मेगापिक्सेल रिअर आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कनेक्टिव्हिटी : 4जी, वायफाय 802.11 बी/जी/एन, ब्ल्यूटूथ 4.1, जीपीएस