iPhone 14 Pro Look Leake : अ‍ॅपल कंपनी लवकरच त्यांचा नवा iPhone 14 Pro बाजारात आणणार आहे. यासाठी कंपनीकडून जोरदार तयारी सुरु आहे. अलिकडेच सोशल मीडियावर आगामी आयफोन 14 बाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशात आता आयफोन 14 प्रोचा (iPhone 14 Pro) लूक रेंडर्सकडून लीक झाला आहे. आयफोन 14 प्रोच्या अधिकृत लाँचसाठी अद्याप काही महिने बाकी असताना आयफोन 14 प्रोचा लूक लीक झाला आहे. नव्या समोर आलेल्या माहितीनुसार नवा आयफोन 14 प्रो (iPhone 14 Pro) जांभळ्या रंगात असणार आहे. 


लीक करण्यात आलेल्या माहितीनुसार आयफोन 14 प्रो जांभळ्या रंगात असेल. तसेच या आयफोनमध्ये सोनेरी आणि चंदेरी रंगाचा पर्यात उपलब्ध असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नव्या आयफोन 14 प्रोमध्ये डिस्पेवर नॉनऐवजी पंच-होल आणि गोल कटआऊट डिझाइन असेल. शिवाय डिस्पेमध्ये अरुंद बेझल्स असतील यामुळे या आयफोनला अधिक पॉलिश लूक मिळेल असा असण्याचा अंदाज आहे. 


आयफोन 14 प्रोमध्ये मुख्य म्हणजे प्रीमियम फिनिशसाठी काच आणि स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात येईल अशी शक्यता लीकर्सकडून वर्तवण्यात येत आहे. या आयफोनच्या कडा सपाट असून मोठा कॅमेरा बंप असेल जो या आधीच्या कॅमेरा बंपच्या तुलनेनं मोठा असेल. तसेच या आयफोनमध्ये जांभळ्या रंगासह, सोनेरी आणि चंदेरी रंगाचा पर्याय असण्याची शक्यता आहे.




(Photo Source : Jon Prosser/ Front Page Tech)


हे फिचर्स स्कीमॅटिक्स अ‍ॅपल विश्लेषक मिंग-ची कुओ यांच्या अंदाजानुसार आहेत. कुओ यांनी या वर्षाच्या सुरुवातीला मार्चमध्ये सांगितले होते की, आयफोन 14 प्रो तसेच आयफोन 14 प्रो मॅक्समध्ये कॅमेरा बंप अधिक ठळक होण्याची शक्यता आहे. नव्या आयफोनमध्ये 48 मेगापिक्सेल सेन्सर वापरण्यासाठी कॅमेरे अपग्रेड करण्यात येईल. सध्याच्या फ्लॅगशिप आयफोन मॉडेल्सवरील 12 मेगापिक्सेल सेन्सर आहे. कुओ यांनी सांगितले की 48 मेगापिक्सेल CIS ची लांबी 25-35 टक्क्यांनी तर सेन्सरच्या 7P लेन्सची उंची 5-10 टक्क्यांनी वाढेल.


कुओ यांनी अंदाज वर्तवला आहे की, आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 प्रो मॅक्समध्ये पंच-होल आणि पिल कटआउटच्या बाजूने नॉच कमी करण्यात येईल. हा सेटअप ऍपलला फेस आयडी-संबंधित सेन्सर्सचे अॅरे आणि डिस्प्लेच्या शीर्षस्थानी कॅमेरा पॅक करण्यास मदत करेल. एक खाच पण खाच अजूनही चांगल्यासाठी दूर जात नाही. आयफोन 14, आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 मॅक्समध्ये एक नॉच वापरला जाईल असाही अंदाज वर्तवला जात आहे. 


संबंधित इतर बातम्या