नवी दिल्ली : 'डॉट वेब' डोमेनची 'नू डॉट कॉम'ने 900 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. 'नू डॉट कॉम'सोबत या लिलावात गूगल, एफिलियास, रेडिक्स आणि डू नट्स यांचाही सहभाग होता. विशेष म्हणजे 'डॉट वेब'च्या विक्रीला चार वर्षांचा कालावधी लागला. मात्र, 'नू डॉट कॉम'ने लावलेली बोली ही सर्वात जास्त होती.


 

नू डॉट कॉमला डोमेनच्या नावात फेरबदल करण्याचे अधिकारही मिळाले आहेत. विक्रीची प्रक्रिया 2012 पासून सुरु होती. रेडिक्स आणि डू नट्सने नू डॉट कॉमवर विक्रीशी संबंधित प्रक्रियेच्या उल्लंघनाचा आरोपही केला होता.

 

आयसीएएनएन या नॉनप्रॉफिट संस्थेनेही या डोमेनचा लिलाव केला होता. ही संस्था इंटरनेटच्या नावाशी संबंधित डेटाबेसचं समन्वय आणि प्रक्रियेचं काम साभाळत होती.

 

याआधी डॉट शॉप हे डोमेनची 2016 च्या जानेवारीत 276 कोटींना विक्री झाली होती. तर त्याआधी 2015 मध्ये डॉट अॅप हे डोमेन 166 कोटींना विकलं गेलं होतं.