फेसबुक यूझर्सची संख्या तब्बल....
एबीपी माझा वेब टीम | 01 Aug 2016 02:56 AM (IST)
मुंबई : सोशल नेटवर्किंग जायंट फेसबुकच्या मिळकतीत 2016 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये अफाट वाढ झाली आहे. फेसबुकचं महसूल 6.44 अब्ज डॉलर असून, यूझर्सची संख्या 1.71 अब्जांवर पोहोचली आहे. फेसबुकने दुसऱ्या तिमाहीत 6.44 अब्ज डॉलरच्या महसुलाचा अंदाज बांधला होता. मात्र, कंपनीने 2.02 अब्ज डॉलर केवळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 71.9 कोटी डॉलर महसूल होतं. वॉल स्ट्रीटच्या गुंतवणूकदारांनीही फेसबुकच्या महसूल वाढीवर जाहीर आनंद व्यक्त केला आहे. फेसबुकच्या शेअर्सच्या किंमतींमध्ये 7.5 टक्क्यांची वाढ झाल्याची पाहायला मिळाली आणि शेअर्स 132 डॉलर प्रति शेअरवर बंद झालं. रोज फेसबुक यूझर्स वापरणाऱ्यांची संख्या सरासरी 1.13 अब्ज असून, यूझर्सची संख्या आधीच्या महिन्यांच्या तुलनेत 17 टक्क्यांनी अधिक आहे. मोबाईलवरुन फेसबुक वापरणाऱ्यांच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे.