National Telegram Founder Again Warns Users of Whatsapp : टेलीग्राम अॅपचे (Telegram App) संस्थापक पॉवेल दुरोव (Pavel Durov) व्हॉट्सअॅपसंदर्भातील (Whats App) वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. अशातच आता त्यांनी व्हॉट्सअॅपबाबत (Whats App News) पुन्हा नवा दावा केला आहे. हॅकर्स व्हॉट्सअॅप युजर्सच्या फोनवरील सर्व गोष्टी पूर्णपणे ऍक्सेस करू शकतात, असा दावा टेलीग्रामच्या संस्थापकांनी केला आहे. तसेच, त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केलं की, "युजर्सनी व्हॉट्सअॅप सोडून टेलीग्रामचा वापर करावा, असा माझा हेतू नाही. त्यांनी इतर कोणतंही मेसेजिंग अॅप (Messaging App) वापरावं, फक्त व्हॉट्सअॅपपासून दूर राहावं."


व्हॉट्सअॅपनंच गेल्या आठवड्यात सुरक्षा समस्येचा पर्दाफाश केला असल्याचं टेलीग्रामवर एक पोस्ट करत पॉवेल यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, "तुमच्या फोनवर ताबा मिळवण्यासाठी हॅकर्सला फक्त एक व्हिडीओ पाठवायचा आहे. व्हॉट्सअॅपवर तुमच्यासोबत व्हिडीओ कॉल सुरू करायचा आहे." यापूर्वी अनेकदा व्हॉट्सअॅपवर टीका करणारे पॉवेल पुढे बोलताना म्हणाले की, "व्हॉट्सअॅपच्या सुरक्षेची समस्या 2018 मध्ये सापडली होती. त्यानंतर 2019 मध्ये एक आणि 2020 मध्ये दुसरी समस्या होती तशीच आहे. आणि हो, त्यापूर्वी 2017 मध्येही होती. 2016 पूर्वी व्हॉट्सअॅपमध्ये एन्क्रिप्शन नव्हतं."


पॉवेल यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये व्हॉट्सअॅप युजर्सना आपल्या स्मार्टफोनमधून व्हॉट्सअॅप डिलीट करण्यास सांगितलं होतं. यामुळे तुमचे मेसेज आणि फोटो लीक होणार नाहीत, असंही त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. गेल्या वर्षीही त्यांनी पुन्हा एकदा व्हॉट्सअॅपवर निशाणा साधला होता. व्हॉट्सअॅपच्या नवीन अटी युजर्सना त्यांचा सर्व वैयक्तिक डेटा फेसबुकसोबत शेअर करण्यास सांगत असल्याचा आरोप करत युजर्सना व्हॉट्सअॅप डिलीट करण्यास सांगितलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :