Aadhaar Card in WhatsApp : केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने काही वर्षांपूर्वी डिजिलॉकर (DigiLocker) सर्विस लाँच केली होती. डिजिलॉकरमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, मार्कशीट आणि कोरोना प्रमणपत्र यासारख्या प्रमाणीकृत कागदपत्रे/प्रमाणपत्रे सेव्ह करता येत होती. आता हीच सेवा WhatsApp वर देखील उपलब्ध आहे. तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखी कागदपत्रे सहजपणे डाउनलोड करता येणार आहे. तुम्हाला MyGov Helpdesk WhatsApp chatbot याच्या माध्यमातून डिजिलॉकरवरुन आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखी कागदपत्रे WhatsAppवर डाऊनलोड करता येईल.
WhatsApp वर MyGov हेल्पडेस्क च्या माध्यातून काही सोप्या स्टेप्सद्वारे कागदपत्रे डाऊनलोड करता येतात. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मार्कशीट आणि इतर कागदपत्रे डाऊनलोड करता येतात. त्यासाठी तुम्हला डिजिलॉकरवर खातं असणं अनिवार्य आहे. तुम्हाला क्षणात व्हॉट्सअॅपवर कागदपत्रे डाऊनलोड करता येतील.... पाहूयात सोप्या स्टेप्स...
स्टेप 1 : फोनमध्ये MyGov हेल्पडेस्कचा +91-9013151515 हा क्रमांक सेव्ह करा..
स्टेप 2 : व्हॉट्सअॅप ओपन करुन संपर्क यादी रिफ्रेश करा...
स्टेप 3 : MyGov हेल्पडेस्क व्हॉट्सअॅपच्या चॅटबॉक्समध्ये सर्च करा आणि ओपन करा
स्टेप 4 : MyGov हेल्पडेस्कमध्ये 'Namaste' अथवा 'Hi' टाईप करा...
स्टेप 5: चॅटबॉक्समध्ये तुम्हाला डिजिलॉकर आणि कोविन सर्विस हे दोन पर्याय मिळतील... त्यापैकी 'DigiLocker Services' या पर्यायाची निवड करा...
स्टेप 6 : डिजिलॉकरमध्ये तुमचं खाते आहे का? असा प्रश्न विचारला जाईल. 'Yes' हा पर्याय निवडा.. (डिजिलॉकरवर तुमचं खातं नसेल तर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अथवा अॅपवर खातं उघडा)
स्टेप 7: चॅटमध्ये तुम्हाला 12 क्रमांकाचा आधार क्रमांक पोस्ट करा..
स्टेप 8: तुमच्या नोंदणीकृत खात्यावर एक OTP मिळेल. तो चॅटमध्ये टाका...
स्टेप 9 : चॅटमध्ये तुम्हाला डिजिलॉकरमधील सर्व कागदपत्राची यादी मिळेल.
स्टेप 10 : तुम्हाला ज्या क्रमांकाचं कागदपत्र हवेय, तो क्रमांक टाईप करा...
स्टेप 11 : तुम्ही निवडलेलं कागदपत्र PDF मध्ये तुम्हाला मिळेल. तुम्ही ते डाऊनलोड करु शकता.
महत्वाचं, तुम्ही एका वेळेस एकच डॉक्युमेंट डाऊनलोड करु शकता. त्याशिवाय डिजिलॉकरमध्ये असणारी कागदपत्रेच डाऊनलोड करु शकता. जर तुमची महत्वाची कागदपत्रे डिजिलॉकरमध्ये नसतील, तर डाऊनलोड करता येणार नाही.