नवी दिल्ली : सर्वाधिक वेगाने ग्राहक जोडण्याचा विक्रम करणाऱ्या रिलायन्स जिओने आणखी एक विक्रम केला आहे. जिओचं माय जिओ हे मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअरवर 10 कोटी वेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे. एखाद्या भारतीय दूरसंचार कंपनीचं मोबाईल अॅप एवढ्या वेळा डाऊनलोड केलं जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
माय जिओ अँड्रॉईडवर जास्त वेळा डाऊनलोड केलं जाणारं दुसरं अॅप ठरलं आहे. माय जिओ अॅप 10 कोटी वेळा डाऊनलोड करण्यात आलं. एकाच वर्षात एवढ्या वेळा डाऊनलोड करण्यात आलेलं हे पहिलंच अॅप आहे, अशी माहित जिओच्या अधिकाऱ्याने दिली.
10 कोटी वेळा डाऊनलोड केलेलं माय जिओ दुसरं भारतीय अॅप आणि एखाद्या कंपनीचं पहिलंच सेल्फ केअर अॅप आहे. हॉटस्टार सध्या माय जिओच्या पुढे आहे.
एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या दूरसंचार कंपन्यांचेही सेल्फ केअर अॅप आहेत. या कंपन्यांचं अॅप गुगल प्ले स्टोअरवर एक कोटी वेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे.
रिलायन्स जिओचं टीव्ही अॅप 'जिओ टीव्ही' 5 कोटी वेळा, तर एअरटेलचं टीव्ही अॅप 50 लाख वेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे.
माय जिओ अॅपचा विक्रम, प्ले स्टोअरवर 10 कोटी डाऊनलोड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Aug 2017 10:51 AM (IST)
10 कोटी वेळा डाऊनलोड केलेलं माय जिओ दुसरं भारतीय अॅप आणि एखाद्या कंपनीचं पहिलंच सेल्फ केअर अॅप आहे. हॉटस्टार सध्या माय जिओच्या पुढे आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -