168 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, एअरसेलचा नवा प्लॅन
एबीपी माझा वेब टीम | 12 Aug 2017 02:51 PM (IST)
एअरसेलनं 419 रुपये आणि 299 रुपये असे दोन प्लॅन लाँच केले आहेत.
मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता एअरसेलनं 419 रुपये आणि 299 रुपये असे दोन प्लॅन लाँच केले आहेत. 419च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांसाठी तब्बल 168 जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच दररोज 2 जीबी डेटा. तसेच अनलिमिटेड कॉलिंगही यामध्ये देण्यात आलं आहे. 419 रुपयांचा एअरसेलचा हा नवा प्लॅन पूर्वोत्तर राज्यांसाठी असणार आहे. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये या प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करु शकतात. पण यावर मिळणारा डेटा 2जी आणि 3जी असणार आहे. तर एअरसेलनं 299 रुपये किंमतीचा दुसरा प्लॅन देखील लाँच केला आहे. यामध्ये 84 दिवसांसाठी 84 जीबी डेटा म्हणजेच दररोज 1 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये फक्त एअरसेल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. (नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही, याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा)