मोटो Z प्लसबाबत अनेक लीक रिपोर्ट समोर आले आहेत. हा मोटोरोलाच्या प्रीमियम Z सीरीजचा स्मार्टफोन आहे.
काही रिपोर्टनुसार, मोटो Z2 प्लस हा 7.1 नॉगट ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे. तसंच या स्मार्टफोन बराच स्लीम असेल. या स्मार्टफोनची बॅटरी 3000 mAh असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मोटो Z2 प्ले मध्ये 5.5 इंच स्क्रीन आणि रेझ्युलेशन 1080 X 1920 पिक्सल असू शकतं. स्नॅपड्रॅगन 626 चिपसेट असण्याची असेल असा अंदाज आहे. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 63 जीबी इंटरनल मेमरी असण्याची शक्यता आहे.
यामध्ये 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असेल असंही लीक रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.