मुंबई: आधार कार्डशी पॅन लिंक करणं आता आणखी सोपं झालं आहे. आयकर विभागाने यासाठी आता एसएमएस सेवाही सुरु केली आहे. याबाबत वृत्तपत्रामध्ये जाहिरातही देण्यात आली आहे. याआधी ई-फायलिंग ही ऑनलाईन सुविधा सुरु करण्यात आली होती.

आयकर विभागकडून वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत पॅन कार्ड आधारकार्डशी कसं लिंक करावं हे सांगण्यात आलं आहे. असं करण्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या मोबाइल क्रमांकावरुन 567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे.

पॅनकार्ड लिंक करण्यासाठी असा करा एसएमएस:

UIDPAN (स्पेस) तुमचा आधार नंबर (स्पेस) तुमचा पॅनकार्ड नंबर असा SMS या 567678 किंवा 56161 नंबरवर करा.


ई-फायलिंगने असं करा पॅनकार्ड आधारशी लिंक:

सरकारने इन्कम रिटर्न भरण्यासाठी पॅनसोबतच आधार कार्डही अनिवार्य केलं आहे. त्यामुळे करदात्यांना आधार कार्ड पॅनशी लिंक करण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून आयकर विभागाने आपल्या वेबसाईटवर ही नवी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.

वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.

दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.

संबंधित बातम्या:

आता एका क्लिकवर पॅनसोबत आधार कार्ड लिंक करा!