Motorola G42 Launch in India : Motorola ने आपला नवा स्मार्टफोन Moto G42 भारतात लॉन्च केला आहे. Moto G42 हा Moto G मालिकेतील नवा स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी युरोपमध्ये लॉन्च करण्यात आला होता, Motorola G42 हा स्मार्टफोन म्हणजे, Moto G41 ची अपग्रेडेड आवृत्ती असल्याचं बोललं जात आहे. Moto G42 सोबत 20:9 आस्पेक्ट रेशो असलेला एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय स्नॅपड्रॅगन सीरिजचा ऑक्टा-कोर प्रोसेसरही या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. Redmi Note 11, Realme 9i आणि Poco M4 Pro सारखे स्मार्टफोन Moto G42 ला आव्हान देतील. चला जाणून घेऊया Moto G42 चे फीचर्स आणि किंमत.



Moto G42 चे फीचर्स



  • Moto G42 मध्ये अॅन्ड्रॉइड 12 देण्यात आला आहे. 

  • Moto G42 मध्ये 6.4 इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचं रिझोल्यूशन 1080x2400 पिक्सल इतकं आहे. याशिवाय, डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे.

  • Moto G42 फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU देण्यात आला आहे. 

  • Moto G42 स्मार्टफोन 4 GB LPDDR4x रॅम आणि 64 GB स्टोरेजसह उपलब्ध आहे.

  • Moto G42 मध्ये तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल आहे, त्याचं अपर्चर f/1.8 आहे. तर, दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगलची आहे आणि तिसऱ्या लेन्समध्ये 2 मेगापिक्सलचा मॅक्रो

  • सेन्सर आहे.

  • फ्रंट कॅमेर्‍याबद्दल बोलायचं झालं तर, या मोटो स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

  • Moto G42 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth v5.0, FM रेडिओ, GPS/A-GPS, NFC, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. 

  • सुरक्षेच्या दृष्टीनं Moto G42 फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

  • Moto ने या स्मार्टफोनमध्ये Dolby Atmos सह ड्युअल स्टीरिओ स्पीकर दिले आहेत.

  • वॉटर रेझिस्टंटसाठी Moto G42 ला IP52 ची रेटिंग देण्यात आली आहे. 

  • बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर Moto G42 मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 20W टर्बोपॉवर चार्जिंगला सपोर्ट करते. 



Moto G42 ची किंमत


4 GB रॅमसह Moto G42 च्या 64 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या किंमतीसह, Moto G42 स्मार्टफोन 11 जुलैपासून फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन अटलांटिक ग्रीन आणि मेटॅलिक रोज कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. लॉन्चिंग ऑफर अंतर्गत, Moto G42 वर 1,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. पण त्यासाठी तुम्हाला फोनचं पेमेंट SBI कार्डद्वारे करणं आवश्यक आहे.