Motorola Edge 30: स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलानं जगातील सर्वात स्लीम स्मार्टफोन लॉन्ट केला आहे. कंपनीनं एका लॉन्च इव्हेंटमध्ये Motorola Edge X30 चॅम्पियन एडिशन आणि मिड-रेंज Motorola Edge 30 ची घोषणा केली. याशिवाय मोटोरोलानं मोटो जी सीरीजच्या मिड-रेंज मॉडेलची घोषणा केली आहे. मोटोरोलोच्या Motorola Edge 30 स्मार्टफोनला गेल्या महिन्यात चीनच्या 3C प्रणामपत्र मिळाली आहेत. या स्मार्टफोनमध्ये  6.6-इंचाचा डिस्प्ले आणि दमदार बॅटरी आणि 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा स्मार्टफोन वॉटर रेसिस्टंट देखील आहे.


मोटोरोला एज 30 मधील धमाकेदार फिचर्स
मोटोरोला एज 30 मध्ये 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.  या स्मार्टफोनला ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन 778G+ प्रोसेसर आणि Adreno 642L GPU देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये  8GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, तर, 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. विशेष म्हणजे, या स्मार्टफोनमध्ये दमदार बॅटरी देण्यातल आली आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता 4000 एमएएच इतकी आहे. हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित MyUX वर काम करतो.


मोटोरोला एज 30 ची किंमत
मोटोरोला एज 30 दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 6 जीबी + 128 जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 27, 999 इतकी आहे. तर, 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन Aurora Green आणि Meteor Grey कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. येत्या 19 मे पासून ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल आणि इतर रिटेल स्टोरेजवर उपलब्ध असेल. विशेष म्हणजे, एचडीएफसी बँक ग्राहकांना या स्मार्टफोनवर दोन हजारांची बचत करता येणार आहे. कंपनीने गेल्या महिन्यात मोटोरोला एज 30 चा (8GB + 128GB) युरोपमध्ये 449.99 युरोमध्ये लॉन्च केला होता.


हे देखील वाचा-