मुंबई : मोटोरोलाचा बहुप्रतीक्षित स्मार्टफोन 'मोटो Z प्ले'बाबत आतापर्यंत खूप माहिती लीक झाली आहे. मात्र, आता या स्मार्टफोनचं पोस्टर समोर आलं आहे. याआधी 'मोटो Z प्ले' डिव्हाईसचे स्पेसिफिकेशनही समोर आले होते.

 
'GFX बेंच'च्या माहितीनुसार, 'मोटो Z प्ले'मध्ये 5.5 इंचाचा डिस्प्ले असून, डिस्प्लेचं रिझॉल्युशन 1080×192 पिक्सेल असेल. या नव्या स्मार्टफोनमध्ये 2GHz ऑक्टाकोर एड्रिनो 506 GPU प्रोसेसर आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजही असण्याची शक्यता आहे.

 

                                                                 सौजन्य - AndroidHits

'मोटो Z प्ले'मध्ये 16 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यताही अनेक टेक वेबसाईट्सनी वर्तवली आहे. यामध्ये 3,500 mAh क्षमतेची बॅटरी असेल.

 
याआधी काही वेबसाईट्सवर लीक झालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट्स असतील. पहिल्या व्हेरिएंटमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज आणि दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असेल.

 
मोटोरोला कंपनी येत्या 6 सप्टेंबरला चीनमधील एका इव्हेंटमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता आहे.