प. बंगालमधील आसनसोलमधील एका कुटुंबाला आपली जुनी कार विकायची होती. कार विकण्यासाठी घरातील मोठ्या मुलानं या कारची जाहिरात ओएलएक्सवर दिली. ही जाहिरात पाहल्यानंतर दोघांनी त्या मुलाला फोन करुन कार खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली.
25 ऑगस्टला दोन मुलं कार पाहण्यासाठी त्यांच्या घरी आले. कार खरेदी करण्यापूर्वी त्यांनी कारच्या टेस्ट ड्राईव्हची मागणी केली. त्यानंतर त्या कुटुंबातील मुलासोबत ते दोघेही कारमध्ये बसले. एकजण कार चालवित होता. तर दुसरा त्याच्या मागे बसला होता.
टेस्ट ड्राईव्हनंतर आपला मुलगा घरी परत येईल असं त्याच्या कुटुंबीयांना वाटलं. पण अनेक तासांनंतरही मुलगा आणि कार यापैकी काहीही परत आलं नाही. कुटुंबीयांना त्याची चिंता वाटू लागल्यानं त्यांनी मुलाचा फोनवर कॉलही केला. मात्र, त्याचा फोनही बंद होता.
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने दोघांनी मुलाचं अपहरण केल्याचं आरोप कुटुंबानं केला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रारही नोंदवली आहे. सध्या पोलीस त्या दोघा आरोपींचा शोध घेत आहेत.