मुंबई: मोटोरोलाने यापूर्वी मेटल बॉडी असलेले दोन स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध केले होते. पण आज मोटोरोला याच मालिकेतील ग्रे रंगाचा स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध करुन देत आहे. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार असून, याची किंमत 15,999 रुपये असेल.

गेल्या वर्षी मोटोरोलाने डिसेंबरमध्ये मेटल बॉडीमधला दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले होते. यावेळी या दोन स्मार्टफोनपैकी एका स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबीची स्टोअरेज कपॅसिटी होती. या वॅरिएंटची किंमत 15999 रुपये होती. तर दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोअरेज कपॅसिटी होती. या वॅरिएंटची किंमत 17,999 रुपये होती.

आज विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या Moto M स्मार्टफोनमध्ये अॅन्ड्रॉईड 6.0 मार्शमेलोवर काम करतो. तसेच यामध्ये 5 इंचाचा फुल एचडी 2.5D IPS डिस्प्ले आहे. या डिस्प्लेची रिझॉल्यूशन क्वॉलिटी 1080 x 1920 पिक्सेल आहे. तसेच 2.2 GHz  64 बीटचा मीडियाटेक हीलियो P 15 प्रोसेसर आहे.

याशिवाय या स्मार्टफोनची एक्सटर्नल स्टोअरेज कपॅसिटी 128 जीबीपर्यंत आहे. तसेच यामध्ये ड्यूल सीमसाठी हायब्रीड सीम स्लॉट असतील. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा, तर फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेल आहे.

मोटो M चा बॅटरी बॅकअप 3050mAh असून, तो जलद चार्ज होतो. यावर स्प्लॅश प्रुफ नॅनो कोटिंगचा मुलामा दिला आहे. तसेच 4G VoLTE वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाईचे सी पोर्टल असतील. फ्लिपकार्टने या स्मार्टफोनसाठी एक्सचेंज ऑफरही दिली आहे.