मुंबई: फेसबुकला आज 4 फेब्रुवारी रोजी 13 वर्षे पूर्ण होत असल्याने, फेसबुकने आपला हा वाढदिवस 'फ्रेंडस डे' म्हणून साजरा करत आहे. फेसबुकने गेल्या वर्षीही आपल्या वर्धापन दिनानिमित्त सर्व यूजर्ससाठी 'फ्रेंडस् डे'वर आधारीत व्हिडिओ तयार केला आहे.
सध्या फेसबुकचा हा व्हिडिओ सर्वांच्या प्रोफाईलवर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये यूजर्सच्या मित्रांचे लहान-लहान फोटो एकत्रित करुन, एखादे नृत्य करणारे चित्र तयार केले आहे. या व्हिडिओमध्ये यूजर्सनी त्यांच्या प्रोफाईलवर शेअर केलेले फोटो आणि आठवणी या व्हिडिओत समाविष्ट केल्या आहेत.
याशिवाय यूजर्सना त्यांचे फोटो, मित्रांसोबतचे किस्से आणि त्यांच्यासोबतची चर्चा या सर्व #friendsday या हॅशटॅगवर पोस्ट करण्याची सूट दिली आहे.
फेसबुकच्या 11 वर्धापन दिनी फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग यांनी फेसबुकचा वाढदिवस हटके पद्धतीने साजरा करण्याची संकल्पना मांडली. त्याला फेसबुक यूजर्सकडूनही भरघोस प्रतिसाद मिळाला. आता फेसबुकच्या 13 व्या वाढदिवसानिमित्त सर्व फेसबुक यूजर्सचे आभार मानले असून, सर्वांना 'फ्रेंडस डे'च्या उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे.