मुंबई: मोटोरोला मंगळवारी भारतात आपला नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. एका इव्हेंटमध्ये मोटो G5 लाँच करणार आहे.  मंगळवारी 12:15 वा. हा स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे.

मोटो G5 च्या फीचर्सचा विचार केल्यास यामध्ये 5 इंच HD डिस्प्ले असणार आहे. 1.4 GHz ऑक्टा कोअर, स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसरवर काम करणाऱ्या या फोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. यामध्ये 2800 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

- कंपनीनं याआधी भारतात मोटो G5 प्लस स्मार्टफोन लाँच केला होता.

- मोटो G5 स्मार्टफोन MWC 2017 मध्ये पेश करण्यात आला होता.

- मोटो G4 स्मार्टफोनची किंमत 12,499 रु. होती. त्यामुळे G5 ची किंमत देखील यांच्याच आसपास असण्याची शक्यता आहे.

- हा स्मार्टफोन तुम्ही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनवर खरेदी करु शकता.

- 5 एप्रिलपासून हा स्मार्टफोन सेलसाठी उपलब्ध असणार आहे.

संबंधित बातम्या:

भारतात 4 एप्रिलला Moto G5 स्मार्टफोनचं लाँचिंग