मोटो जी 5 आणि मोटो जी5 प्लस स्मार्टफोनचे फीचर्स:
- दोन्ही स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंटमध्ये सेन्सर असणार आहे.
- मोटो जी सीरीजच्या 5व्या व्हर्जनचे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉईड 7.0 नोगट ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे.
- मोटो जी5 मध्ये 5 इंच स्क्रीन असणार आहे. तर मोटो जी5 प्लसमध्ये 5.2 इंच स्क्रीन असणार आहे.
- दोन्ही मोबाइलमध्ये स्क्रिन फूल एचडी असून याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल असणार आहे.
- मोटो जी5 मध्ये 1.4Ghz Snapdragon 430 प्रोसेसर आहे तर मोटो जी5 प्लसमध्ये 2Ghz Snapdragon 625 ऑक्टा-कोर प्रोसेसर असणार आहे.
- मोटो जी5मध्ये 2 जीबी आणि 3 जीबी व्हेरिएंट आहेत तर मोटो जी5 प्लसमध्ये 2 जीबी, 3 जीबी आणि 4 जीबी व्हेरिएंट असणार आहेत.
- मोटो जी5मध्ये इंटरनल मेमरी 16 किंवा 32 जीबी असणार आहे. तसेच एसडी कार्डद्वारे 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.
- मोटो जी5 प्लसमध्ये इंटरनल मेमरी 32 आणि 64 जीबी असणार आहे. तर एसडी कार्डद्वारे 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येईल.
- या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असणार आहे.
- मोटो जी5मध्ये 2800mAh बॅटरी असणार आहे. तर जी5 प्लसमध्ये 3000mAh बॅटरी असणार आहे.
संबंधित बातम्या: