मुंबई : मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या मेट्रो सिटीजमध्ये सर्वाना काही झटपट हवं असतं. ऑफिसच्या कामापासून ते खाण्यापर्यंतचे सर्व पदार्थ पटापट व्हावी, असे प्रत्येकाला वाटतं. खाण्या-पिण्याच्या क्षेत्रात अशीच झटपट पदार्थ देण्यासाठी एक क्रांती घडली आहे.

 

आतापर्यंत आपण झटपट खाण्यासाठी मॅगीची निवड करतो. कारण अवघ्या दोन मिनिटांत मॅगी तयार होते. मात्र, आता पिझ्झाही तुम्हाला अवघ्या 4 मिनिटांत उपलब्ध होऊ शकणार आहे.

 

तुम्ही दुकानातून पिझ्झा ऑर्डर केल्यास, अर्धा-पाऊण तासाची वाट पाहावी लागते. मात्र, आता अवघ्या 4 मिनिटांत पिझ्झा तुमच्यासाठी तयार असेल आणि तेही एटीएमसारख्या मशीनमधून. पिझ्झाच्या या मशीनचं नाव आहे एटीपी म्हणजेच एनी टाईम पिझ्झा.

 

मुंबईतीली एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एन टाईम पिझ्झा (एटीपी) मशीनचं लॉन्चिंग करण्यात आलं आहे.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष चित्र वाघ आणि गोव्याचे माजी मुंख्यमंत्री दिगंबर कामत उपस्थित होते.