मुंबई : शाओमी इंडियाने ‘शाओमी रेडमी नोट 3’ स्मार्टफोनची भारतात विक्रमी विक्री केली आहे. शाओमी कंपनीच्या दाव्यानुसार, गेल्या दोन महिन्यात ‘शाओमी रेडमी नोट 3’ स्मार्टफोनची तब्बल 6 लाखांहून अधिक हँडसेट्सची विक्री झाली आहे. कंपनीचे प्रेसिडेंट ह्युगो बारा यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यामातून असा दावा केला आहे.

 

ह्युगो बारा यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “एमआय इंडियाने नव्या विक्रमाची नोंद केली आहे. साप्ताहिक सेलच्या माध्यमातून 60 दिवसांत ‘शाओमी रेडमी नोट 3’ स्मार्टफोन्सच्या हँडसेट्सची 6 लाखांहून अधिक विक्री करण्यास आम्हाला यश मिळालं आहे.”

 

‘शाओमी रेडमी नोट 3’ भारतात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉन्च झाला होता. ‘शाओमी रेडमी नोट 3’चे दोन व्हेरिएंट आहेत, ज्यामध्ये रॅम आणि स्टोरेज वेगवेगळे आहेत. 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इनबिल्ट स्टोरेज, 3 जीबी रॅम आणि 16 जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज, असे हे तीन व्हेरिएंट आहेत.

 

2 जीही व्हेरिएंट असलेल्या स्मार्टफोनची किंमत 9 हजार 999 रुपये, तर 3 जीबी व्हेरिएंटची किंमत 11 हजार 999 रुपये आहे.