- 5.5 इंच आकाराची एचडी स्क्रिन
- 2GB रॅम
- 16GB इंटर्नल स्टोरेज, 128 GB पर्यंत वाढवता येऊ शकेल
- अँड्रॉईड मार्शमेलो 6.0.1 ऑपरेटिंग सिस्टीम
- 1.5GHz ऑक्टा-कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 617 प्रोसेसर
- एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 3000mAh क्षमतेची बॅटरी, टर्बोपावर
मोटो G 4 आजपासून अमेझॉनवर
एबीपी माझा वेब टीम | 22 Jun 2016 01:23 PM (IST)
मुंबईः मोटोरोला कंपनीचा बहुप्रतिक्षित मोटो G4 हा स्मार्टफोन आज मध्यरात्रीपासून विक्रिसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन भारतात मागच्या महिन्यात लाँच करण्यात आला होता. आज मध्यरात्रीपासून अमेझॉन या साईटवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. मोटो G सिरिजचा हा सर्वात जबरदस्त फीचर्स असणारा फोन मानला जात आहे. विशेष म्हणजे या फोनची किंमत केवळ 12 हजार 499 रुपये आहे. त्यामुळे स्मार्टफोनप्रेमींची या फोनवर एकच उडी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फीचर्सः