मोटो ई 5 ची किंमत 9 हजार 999 रुपये आहे, तर मोटो ई 5 प्लस 11 हजार 999 रुपयात मिळणार आहे. दोन्ही फोन केवळ अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर उपलब्ध असतील. तसंच मोटोरोला रिटेल शॉपमध्ये Moto E5 तर Moto E5 Plus हा फोन 600 पेक्षा जास्त मोटो हब स्टोअरमध्ये मिळणार आहे.
अमेझॉन इंडियाने Moto E5 Plus साठी 11 आणि 12 जुलै या दोन दिवसांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरनुसार एसबीआयच्या क्रेडिट कार्डवर 800 रुपयांची सूट, एक्स्चेंज ऑफरमध्ये अतिरिक्त 1 हजार रुपये, रिलायन्स जिओच्या 198 आणि 298 रुपयांच्या प्लॅनवर 130GB जास्त डेटा, तसंच EMI साठी व्याज लागणार नाही, ही ऑफर दोन दिवसांसाठी उपलब्ध आहे.
कंपनीने मोटो स्टोअरमधून खरेदी करणाऱ्यांसाठीही दोन्ही फोनवर विविध ऑफर दिल्या आहेत. यामध्ये पेटीएम मॉल्स क्यूआरकोडद्वारे पेमेंट करणाऱ्यांना 1200 रुपये कॅशबॅक, 130 GB जिओ डाटाचा समावेश आहे.
बॅटरी
Moto E5 Plus या स्मार्टफोनची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे तब्बल 5000mAh इतक्या क्षमतेची बॅटरी. ही बॅटरी तब्बल 18 तास चालेल असा कंपनीचा दावा आहे.
याशिवाय Moto E5 या फोनची बॅटरीही तितकीच तगडी म्हणजेच 4000mAh क्षमतेची आहे.
कंपनीने या मोबाईलसोबत 18W चा टर्बो चार्जर दिला आहे, ज्यामुळे 15 मिनिटात 6 तास चालेल इतकी बॅटरी चार्ज होणार आहे.
फीचर्स - Moto E5 Plus
5000mAh क्षमतेची बॅटरी- 10 W रॅपिड चार्जिंग
15.21 CM (6 इंच) डिस्प्ले
कॅमेरा - 12 मेगापिक्सल कॅमेरा, ऑटो फोकस आणि एलईडी फ्लॅशसह उपलब्ध
फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल फ्लॅशची सुविधा
ऑपरेटिंग सिस्टिम- अँड्रॉईड 8.0 Oreo
प्रोसेसर - 1.4GHz Snapdragon 430 Octa-core
रॅम – 3GB
स्टोरेज - 32 GB जी 128GB पर्यंत वाढवता येते.
ड्युअल सिम स्लॉट (4G+4G)
किंमत – 11,999
फीचर्स - Moto E5
5.7 इंच HD डिस्प्ले
कॅमेरा – 13 MP आणि 5 MP फ्लॅशसह उपलब्ध.
ऑपरेटिंग सिस्टिम- अँड्रॉईड 8.0 Oreo
बॅटरी - 4000mAh
रॅम – 2GB
स्टोरेज – 16GB
किंमत - 9999
अधिक माहितीसाठी कंपनीच्या वेबसाईटला भेट द्या.