नवी दिल्लीः मोटोरोला कंपनीने ई-सीरीजचा नवा फोन मोटो E3 लाँच केला आहे. मोटोचा हा शानदार फीचर्सचा बजेट स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे हा वॉटरप्रूफ स्मार्टफोन आहे. मात्र या फोनची रॅम आणि स्टोरेज किती असेल याबाबत कंपनीने सस्पेंस कायम ठेवला आहे.

 

 

मोटोने काही दिवसांपूर्वी मोटो जी सीरीजचा मोटो जी 4 आणि मोटो जी 4 प्लस हे जबरदस्त फीचर्सचे दोन फोन लाँच केले होते. बाजारात या दोन्ही फोन्सची सध्या जोरदार विक्री चालू आहे. त्यातच कंपनीने हा बजेट स्मार्टफोन आणला आहे.

 

मोटो E3 चे फीचर्सः

  • 4.5 आकाराची स्क्रीन

  • एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

  • वॉटर प्रूफ

  • स्क्रीन प्रोटेक्टर


 

सध्या हा फोन केवळ ब्रिटनमध्येच उपलब्ध करण्यात आला आहे. भारतात हा फोन कधी येणार याबाबत उत्सुकता आहे. ब्रिटनमध्ये या फोनची किंमत 131 बिलीयन डॉलर म्हणजेच 8 हजार 756 रुपये आहे.