मुंबई: मोटोरोलानं आपला नवा स्मार्टफोन मोटो C प्लस भारतात लाँच केला आहे. शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये आहे.

20 जूनपासून हा स्मार्टफोनमध्ये भारतात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची शाओमीच्या रेडमी 4शी स्पर्धा असणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोटोरोलानं रिलायन्स जिओशी देखील करार केला आहे. Moto C Plusच्या खरेदीवर रिलायन्स जिओकडून 30 जीबी अतिरिक्त 4जी डेटा मिळणार आहे.

Moto C Plus स्मार्टफोनचे खास फीचर :

मोटो सी प्लसमध्ये 5 इंच एचडी 720 पिक्सल डिस्प्ले आहे. तर या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 7.0 नॉगट ऑपरेटिंग सिस्टम असणार आहे. तसेच यामध्ये रिअर कॅमेरा 8 मेगापिक्सल तर फ्रंट कॅमेरा 2 मेगापिक्सल असणार आहे. यामध्ये 1.3 गीगाहर्त्झ क्वॉड कोअर प्रोसेसर देण्यात आलं आहे. तसेच यात 2 जीबी मेमरी आणि 16 जीबी इंटरनल मेमरी आहे. एसडी कार्डच्या मदतीनं मेमरी वाढवताही येऊ शकते.

मोटो सी प्लसमध्ये 4000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामधील इतर फीचर हे मोटो सी प्रमाणेच आहेत.