अमेरिकेतील स्मार्टफोन बाजारात ‘वनप्लस 5’ची किंमत 479 डॉलर म्हणजेच सुमारे 31 हजार रुपये आहे. तिथे 27 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. भारतात मात्र 22 जूनला लॉन्च होणार असून, भारतातील किंमत 32 हजार 999 रुपये असण्याची शक्यता आहे.
आयफोन 7 शी मिळता-जुळता असणाऱ्या या स्मार्टफोनची बॉडी मेटलमध्ये आहे. वनप्लसचा आतापर्यंतचा हा सर्वात स्लीम स्मार्टफोन आहे. 2 सेकंदात स्मार्टफोन अनलॉक करण्याची क्षमतेचं फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
‘वनप्लस 5’चे ‘स्मार्ट’ फीचर्स :
- 5 इंचाचा स्क्रीन (1920×1080 पिक्सेल रिझॉल्युशन)
- 5D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन 5
- 45GHz ऑक्टा कोर क्लावकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर
- 8 जीबी रॅम
- 128 जीबी इंटरनल मेमरी
- अँड्रॉईड 7.1 नॉगट (ओएस ऑक्सिजन)
कॅमेरा फीचर्स :
- 16 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा
- 20 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा
- 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा (f/2.0 अपॅरचर)
दमदार बॅटरी :
- 3300 mAh क्षमतेची बॅटरी
- बॅटरी नॉन-रिमोव्हेबल
- 30 मिनिटात 60 टक्के चार्जिंगची क्षमता