BSNL चे दोन नवे ईद स्पेशल प्लॅन, दररोज 3GB डेटा मिळणार
एबीपी माझा वेब टीम | 21 Jun 2017 07:14 PM (IST)
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने ईदच्या निमित्ताने दोन नवे प्लॅन लॉन्च केले आहेत. 786 रुपये आणि 599 रुपये किंमतीचे हे दोन्ही प्लॅन आहेत. 786 रुपयांच्या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉल आणि दररोज 3 जी डेटा मिळेल. 90 दिवसांची मुदतीचा हा प्लॅन आहे. 599 रुपयांचा प्लॅनही बीएसएनएलने बाजारात आणला आहे. यामध्ये 786 रुपयांचं टॉकटाईम मिळेल. हा प्लॅनही 30 दिवसांच्या मुदतीचा आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बीएसएनएलने ‘चौका-444 प्लॅन’ लॉन्च केला आहे. मात्र, हा टेरिफ व्हाऊचर असून, तो केवळ प्रीपेड ग्राहकांसाठी असेल. यामध्ये ग्राहकांना दररोज 4 जीबी डेटा मिळेल. याची मुदत 90 दिवसांची आहे.