सोशल मीडियात एबीपी माझाचा दबदबा, ट्विटरवर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2017 10:42 AM (IST)
मुंबई : सुपरफास्ट अपडेटसाठी मराठी माध्यम विश्वात कायमच अग्रेसर राहिलेल्या एबीपी माझाच्या @abpmajhatv या ट्विटर हँडलने आता नवा विक्रम नोंदवला आहे. वाचक आणि प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरुन प्रतिसादामुळे एबीपी माझाच्या ट्विटर हँडलने 3 लाख फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. फॉलोअर्सची संख्या क्षणा-क्षणाला वाढतच आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी माणसाची पहिली पसंती असलेल्या एबीपी माझाने आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे. क्षणाक्षणाचे प्रत्येक अपडेट नेटीझन्सना ट्विटरवर मिळत असल्यानेच एबीपी माझाचं ट्विटर हँडल मराठी विश्वात नंबर वन बनलं आहे. बातम्यांशिवाय विविध फोटो, व्हिडीओ, पोल यांनाही प्रेक्षकांची पसंती आहे. ट्विटरशिवाय www.abpmajha.in या वेबसाईटला दररोज लाखो लोक भेट देतात. त्यामुळेच एबीपी माझाची वेबसाईट महिन्याला 5 कोटी पेजव्ह्यूवचा टप्पा पार करते. सुपरफास्ट अपडेट, सविस्तर बातम्या, दिग्गजांचं विश्लेषण, ब्लॉग, क्रीडा, मनोरंजन, देश-विदेश, टेक्नॉलॉजी, जॉब, लाईफ-स्टाईल, सात-बारा आणि लाईव्ह टीव्ही यासारख्या सेक्शन्सद्वारे आम्ही नेटीझन्सना अपडेट ठेवतो. ट्विटरसोबतच फेसबुकवरही एबीपी माझा नंबर वन आहे. फेसबुकवर नुकतंच एबीपी माझाने 30 लाख लाईक्सचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे एबीपी माझा वाहिनीवरील प्रत्येक बातमीचा स्वतंत्र व्हिडीओ तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. https://www.youtube.com/abpmajhalive या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला एबीपी माझाचे सर्व कार्यक्रम पाहता येतील. याशिवाय गुगल प्लस, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही तुम्ही एबीपी माझाला फॉलो करुन अपडेट राहू शकता.