नॅशनल पेमेंट्स काऊन्सिल ऑफ इंडियाने ‘भीम’ अॅपचं अपग्रेड व्हर्जन लॉन्च केलं. ‘BHIM 1.3’ हे नवं व्हर्जन अँड्रॉईड आणि आयओएस यूझर्ससाठी असून, तीन नवीन फीचर्सचा यात समाविष्ट करण्यात आले आहेत.
‘भीम’ अॅपमधील तीन नवे फीचर्स :
- तीन नवीन भाषा : कॅशलेस व्यवहारासाठी कुणी भीम अॅप वापरत असेल, तर त्यांना भाषेचा अडसर येऊ नये, यासाठी ‘भीम’ अॅपमध्ये आणखी तीन प्रादेशिक भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये मराठी, पंजाबी आणि असमी भाषांचा नव्याने समावेश केल्याने आता ‘भीम’ अॅपमध्ये एकूण 12 भाषा झाल्या आहेत.
- पैसे पाठवण्यासाठी फोन काँटॅक्टचा वापर : ‘भीम’ अॅप वापरणारे आता बेनिफिशियरी निवडीसाठी आपल्या फोनमधील काँटॅक्टचा वापर करु शकतात. मात्र, इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे ज्यांचे मोबाईल नंबर भीम अॅपमध्ये नोंदवलेले असतील, त्यांनाच बेनिफिशियरी म्हणून निवडता येईल.
- QR कोड : नॅशनल पेमेंट्स काऊन्सिल ऑफ इंडियाने ‘भीम’ अॅपच्या अपग्रेडेड व्हर्जनमध्ये QR कोडचा पर्यायही समाविष्ट केला आहे. त्यामुळे स्कॅन अँड पे’साठी हा पर्याय उपयुक्त ठरणार आहे.