मुंबई: मायक्रोसॉफ्ट या टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील जगातली सर्वात मोठ्या कंपनीने सोशल वेबसाइट क्षेत्रातील कंपनी Linkedin ला खरेदी केलं आहे. हा व्यवहार तब्बल २६.३ मिलियन अमेरिकन डॉलरला झाला.


 

एका अहवालानुसार, मायक्रोसॉफ्टने Linkedin ला खरेदी केले असले, तरी Linkedin हा वेगळा ब्रॉण्डच राहणार आहे. तसेच या कंपनीचे सीईओ जेफ वेनर हेच असणार असून ते मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांना रिपोर्ट करणार आहेत.

 

या व्यवहारानंतर बोलताना सत्य नडेला आणि जेफ वेनर यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे. सत्य नडेला यांनी मायक्रोसॉफ्टची सुत्रे हाती घेतल्यापासून गेल्या दोन वर्षातील हा सर्वात मोठा व्यवहार मानला जात आहे.

लिंक्ड इन ही जगातील सर्वात मोठी सोशल वेबसाईट आहे. या कंपनीच्या संतकेतस्थळाचे ४३३ यूजर्स आहेत.