मुंबई: लेनोव्होचा 'वाइब के ५' स्मार्टफोन हा आज भारतात लाँच करण्यात आला. हा स्मार्टफोन याआधीच युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता.
'वाइब के ५' हा स्मार्टफोनचा लूक लिनोव्होच्या 'वाइब के 5 प्लस'प्रमाणेच आहे. फोनमध्ये पाच इंचाचा डिस्पले असून याची रिझॉल्यूशन कपॅसिटी 1280 x 720 पिक्सल आहे. फोनमध्ये 1.4GHz क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 415 ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. या फोनचे इतर फिचर्स 'वाइब के 5 प्लस'सारखेच आहेत. फोनमध्ये 2 जीबीची रॅम देण्यात आली आहे. तसेच 2,750 mAh ची रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. 'वाइब के 5' मध्ये 16 जीबीची एक्सटरनल एक्सपांडेबल मेमरी देण्यात आली आहे. तसेच या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रन्ट आणि 13 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा असून त्याला सोबत एलइडी फ्लॉश लाईटचीदेखील सुविधा उपल्बध करून देण्यात आली आहे.
हे स्मार्टफोन गोल्ड आणि सिलव्हर कलरमध्ये सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या सिरीजमधील A6000 या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये इतकी आहे. तर के 5 प्लसची 8499 इतकी किंमत आहे.