मुंबई : सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट सध्या कॉम्पयूटर, लॅपटॉपमध्ये Windows 10च्या अपग्रेड करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण दुसरीकडे नागरिकांना याच्या अॅटोमॅटिक अपडेटमुळे नाहक त्रास सहन कारवा लागत आहे.


Windows 10च्या अॅटोमॅटिक अपडेटमुळे त्रस्त असलेल्या एका महिलेने मायक्रोसॉफ्ट विरोधात याचिका दाखल केली होती. एका अमेरिकेतील वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, कॅलिफोर्नियामधील ट्रव्हल एजन्सी चालवणारी एक महिला टेरी गोल्डस्टेनकडून मायक्रोसॉफ्टने 10,000 अमेरिकन डॉलर्स म्हणजे 6.78 लाख रुपये भरून घेतले होते.

यानंतर तिच्या कॉम्पयूटरमध्ये Windows 10 अॅटोमॅटिक अपग्रेड होण्यास सुरुवात झाली. यासाठी कंपनीने आपल्याकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. या अपडेटमुळे या महिलेचे मोठे नुकसान झाले. तसेच कॉम्पयूटरमधील तिच्या अनेक महत्त्वाच्या फाईलही करप्ट झाल्या.

 

यावरून महिलेने न्यायालयात धाव घेऊन मायक्रोसॉफ्ट विरोधात याचिका दाखल केली. न्यायालयात या खटल्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने महिलेच्या बाजूने निकाल दिला. तिने दाखल केलेल्या याचिकेत या अपडेशनमुळे ट्रॅव्हल कंपनीच्या उत्पन्नात घट झाली. परिणामी मायक्रोसॉफ्टने याची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही तिने केली होती.

मायक्रोसॉफ्टने भविष्यात हा वाद आणखीन चिघळायला नको यासाठी हे प्रकरण तत्काळ मिटवले आहे.