नवी दिल्ली: मायक्रोमॅक्सने कॅनव्हास सिरीजमधील आपला नवा स्मार्टफोन कॅनव्हास यूनिट 4 प्लस भारतात लाँच केला आहे. याची किंमत फक्त 7,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ग्रे, सिल्व्हर कलरच्या व्हॅरिएंटसोबत बाजारात लाँच करण्यात आला आहे. इंडस ऑपरेटिंग सिस्टिमच्या सहाय्याने या स्मार्टफोनमध्ये देशभरातील १२ प्रादेशिक भाषा या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


 

या स्मार्टफोनच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये यामध्ये होम बटनसोबतच फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आला आहे. यूनाइट 4 प्लसमध्ये 5 इंचाची स्क्रिन देण्यात आली असून, त्याची रिझॉल्यूशन कपॅसिटी 720 x 1280 पिक्सल आहे. तसेच यामध्ये 1GHz क्वार्ड कोर मीडियोटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच 2 जीबी रॅम देण्यात आली आहे.

 

या नव्या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा रिअर ऑटोफोकस कॅमेरा, तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आलेला आहे. फोनमध्ये 16 जीबी इंटरनल मेमरी असून, ती 64 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. कनेक्टिव्हीटीसाठी यामध्ये 4G LTE, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, मायक्रो यूएसबी, प्रॉक्जिमिटी सेंसर, एम्बिएंट सेंसरसारखे ऑप्शन देण्यात आले आहेत.