नवी दिल्लीः मायक्रोमॅक्स कंपनीने कॅनव्हॉस अमेझ 2 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. विशेष म्हणजे या जबरदस्त फीचर्स असलेल्या फोनची किंमत केवळ 7 हजार 499 रुपये ठेवण्यात आली आहे.

 

कॅनव्हॉस अमेझ 2 हा फोन 9 जूनपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. मायक्रोमॅक्सने नोव्हेंबर 2015 मध्ये लाँच केलेल्या कॅनव्हॉस अमेझ स्मार्टफोनचं हे अपग्रेडेड व्हर्जन आहे.

 

कॅनव्हॉस अमेझ 2 स्मार्टफोनचे फीचर्सः

  • 4G ड्युअल सिम


 

  • 5 इंच आकाराची 720x1280 पिक्सल रिझॉल्युशन असणारी स्क्रिन


 

  • लॉलीपॉप 5.1


 

  • 4GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ऑक्टा-कोअर प्रोसेसर


 

  • 2GB रॅम


 

  • 16GB इंटर्नल स्टोअरेज


 

  • एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा


 

  • 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा


 

  • 2500mAh क्षमतेची बॅटरी