मुंबई: मोबाइल कंपनी मायक्रोमॅक्सनं कॅनव्हास 2 (2017) हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. तसंच मायक्रोमॅक्सनं एअरटेलसोबत यासाठी करारही केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 11,999 रु. आहे. 17 मेपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.


या स्मार्टफोनसोबत तुम्हाला एअरटेलचं 4जी सिम कार्डही मिळणार आहे. त्यामुळे यूर्जसला एक वर्षासाठी 4G डेटा मोफत मिळणार आहे. तसंच अनलिमिटेड कॉलिंगही देण्यात आलं आहे.

मायक्रोमॅक्स कॅनव्हास 2 स्मार्टफोनचे खास फीचर्स:

यामध्ये 5 इंच स्क्रिन देण्यात आली आहे. तसेच याचं रेझ्युलेशन 720x1280 पिक्सल आहे.

1.3 GHz क्वॉड कोअर प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम आहे. तसंच यामध्ये 16 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं असून 64 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.

यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

यामध्ये 4जी, वाय-फाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस हे देखील फीचर्स आहेत.

या स्मार्टफोनची बॅटरी 3050 mAh आहे.