नवी दिल्ली: मोबाइल कंपनी आसूसनं आपल्या जेनफोन ZE552KL आणि ZE520KL मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीत 8 हजार आणि 4 हजार रुपयांची कपात केली आहे.


आसूस जेनफोन 3 ZE552KL ची किंमत 27,999 रुपये होती. आता हा स्मार्टफोन 19,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर ZE520KL या स्मार्टफोनची सुरुवातील किंमत 21,999 रुपये होती. आता याची किंमत 17,999 रुपये आहे. जेनफोन सीरीजमधील नवा स्मार्टफोन लाँच करण्यात येणार असल्यानं ही कपात करण्यात आली आहे.

आसूस जेनफोन 3 ZE552K मध्ये 5.5 फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसरसोबत 4जीबी रॅम देण्यात आली आहे. तर यामध्ये 3000 mAh बॅटरी आहे. तसेच यात 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेराही आहे.

आसूस जेनफोन 3 ZE520K  मध्ये 5.2 इंच फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.  यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसरसोबत 4जीबी रॅमही देण्यात आली आहे. तसेच यात 2600 mAh बॅटरी आहे. यात देखील 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे.

हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉईड 7.0 नॉगटवर आधारित आहेत.