शाओमीने भारतीय स्मार्टफोनप्रेमींसाठी स्वस्त आणि मस्त असे दोन इअरफोन बाजारात आणले आहेत. एमआयच्या इअरफोनचे बेसिक व्हर्जन 399 रुपयांना मिळेल, तर दुसऱ्या व्हर्जनची किंमत 699 रुपयांना मिळणार आहे.
याआधीपासून बाजारात उपलब्ध असलेल्या एमआय इअरफोनची किंमत 999 रुपये होती. त्यामुळे आता नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या दोन्ही इअरफोनना मागणी वाढणार आहे.
सिल्व्हर आणि ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये हे इअरफोन उपलब्ध असतील. एमआयच्या ऑफिशियल वेबसाईटवरुन स्मार्टफोनप्रेमींना इअरफोन खरेदी करता येतील.
Mi इअरफोन बेसिक
एमआय इअरफोन बेसिकमध्ये अल्ट्राल लो बास आणि अॅल्युमिनियम अलॉय साऊंड चेंबर आहे. ‘डिझाईन फॉकर इंडिया’ असे या इअरफोनला नाव देण्यात आले आहे. थर्ड जनरेशन डँपिंग सिस्टम यात देण्यात आली असल्याने साऊंडमधील स्पष्टता जाणवेल.
Mi इअरफोन
बेसिक व्हर्जनच्या तुलनेत अधिक फीचर्स असलेल्या एमआय इअरफोनमध्ये डायनॅमिक बास आणि मेटल साऊंड चेंबर देण्यात आले आहे. व्हॅल्युम, आनसर बटन, मायक्रोफोन या इअरफोनमध्ये देण्यात आले आहे. लहान, मध्यम आणि मोठे अशा तीन आकारांमध्ये इअरबड उपलब्ध असून, कंपनीच्या माहितीनुसार या इअरफोनच्या 700 चेकिंग टेस्ट करण्यात आल्या आहेत.