‘मर्सिडिज बेन्झ जीएलसी’ लॉन्च, ताशी 210 किलोमीटर स्पीड
एबीपी माझा वेब टीम | 02 Jun 2016 12:27 PM (IST)
नवी दिल्ली : प्रसिद्ध वाहन निर्माती कंपनी मर्सिडिज बेन्झने आपली लग्झरी एसयूव्ही 2016 जीएलसी कार भारतात लॉन्च केली आहे. मर्सिडिजने जीएलसी कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. मर्सिडिज बेन्झ जीएलसी कारच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 50.09 लाख रुपये असून, डिझेल व्हेरिएंटची किंमत 50.7 लाख रुपये आहे. या किंमती पुण्यातील एका शोरुममधील आहे. पाच जणांसाठी खास डिझाईन केलेल्या या कारच्या स्पीडबाबत प्रचंड चर्चा आहे. कारण ताशी 210 किलोमीटर वेग या कारला असून, वेगवान कार चालवणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. ताशी 0 ते 100 किलोमीटर वेग अवघ्या 8.3 सेकंदात पकडते. मर्सिडिजच्या आतापर्यंतच्या लग्झरी एसयूव्हीमध्ये जीएलसी कार अत्यंत अपडेटेड व्हर्जन मानली जात आहे. स्टायलिंगमध्ये मर्सिडिज बेन्झ जीएलसी कार सी-क्लाससारखी आहे. या एसयूव्ही कारमध्ये क्रोम फिनिश ट्विन स्लॅट ग्रिल आणि फॉक्स स्किड प्लेट लावण्यात आलं आहे, जे सी-क्लाससारखी दिसतं. या कारमध्ये 7 इंचाचा इन्फोटेनमेंट स्क्रीन लावण्यात आलं असून, या इन्फोटनेमेंट सिस्टीममध्ये सीडी स्टिरियो, नेव्हिगेशन, 2 यूएसबी पोर्ट, ब्लूटूथ इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत. कारचं बूट स्पेस 550 लीटरचं असून, रिअर सीटला फोल्ड केल्यानंतर त्यात वाढ होऊन 1600 लीटर होतं.