नवी दिल्ली : इस्त्राईलमधील स्टार्टअप कंपनी सिरिन लॅब्सने लंडनमध्ये महागडा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 16 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 10 लाख रुपये आहे.
या स्मार्टफोनमधील संपूर्ण कम्युनिकेशन 256 बिट चिप-टू-चिप एन्क्रिप्टेड म्हणजेच सिक्युर क्रिप्टो प्रोसेसिंग असेल. सिक्युर कम्युनिकेशनसाठी हे तंत्रज्ञान मिलिट्री फोर्सही करतं. मिलिट्री ग्रेड सिक्युरिटी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
खास सिक्युरिटी स्विच
महागड्या किंमतीमुळे या स्मार्टफोनला रॉल्स रॉयसही म्हटलं जातं आहे. मात्र, या स्मार्टफोनचं नाव ‘सोलारिन’ आहे. स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एक फिजिकल सिक्युरिटी स्विच बटन देण्यात आलं आहे. यावर क्लिक केल्यानंतर सुपर सायबर सिक्योर मोडवर एनेबल होतं. हे मोड विशेषत: एन्क्रिप्टेड कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी बनवलं गेलंय.
अँड्रॉईड 5.1 लॉलिपॉप बेस्ट कस्टम ओएसवर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर आहे. 23.8 मेगापिक्सेल रिअर कॅमेराही देण्यात आला असून, 5.5 इंचाचा 2K रिझॉल्युशन असणारं आयपीएस स्क्रीन देण्यात आलं आहे.
यामध्ये 4000 mAh क्षमतेची बॅटरी असून, 4GB रॅम आणि 128GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. यामध्ये केवळ एका सिमचीच सुविधा असून, तीन पॉवरफुल स्पिकर्स देण्यात आले आहेत. पॉवर बटनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर लावण्यात आलं आहे.