मुंबई: मर्सिडज कंपनीनं भारतात आपल्या एएमजी रेंजमधील एख दिमाखदार कार लाँच केली आहे. एसएलसी 43 असं या कारचं नाव आहे. हे मर्सिडीजचं पहिलं एएमजी मॉडेल आहे. या कारची किंमत तब्बल 77.5 लाख रुपये आहे.


 

या कारमध्ये सगळ्यात मोठा बदल त्याच्या इंजिनमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये 5.5 लीटर केव्ही-8 इंजिनच्या जागी 3.0 लीटरचं ट्विन टर्बो व्ही-6 इंजिन देण्यात आलं आहे. नव्या इंजिनची पॉवर 367 पीएस आणि टॉर्क 520 एनएम आहे. 0 ते 100 वेग पकडण्यासाठी या कारला अवघी 4.7 सेंकदाचा वेळ लागतो. या कारचा टॉप स्पीड 250 किमी. प्रतितास आहे. यामध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि पॅडल शिफ्टर्स स्टॅण्डर्ड मिळेल.

 

या कारच्या डायनामिक सिलेक्ट फीचरच्या मदतीनं कारचं सस्पेंशन तुम्हाला हवं तसं सेट करता येईल.

 

डिझाइनच्या विचार केल्यास या कारमध्ये नवं डायमंड फ्रंट ग्रिल, दमदार बोनेट, इंटिग्रेटेड क्रोम फिनिश टेल पाइप आणि 18 इंच लाइट अलॉय व्हिल मिळेल. फीचर्सचा विचार केल्यास ब्लाइंड स्पॉट असिस्ट, लेदर मल्टी फंक्शनल स्टीयरिंग व्हील, 7 इंच टचस्क्रिन इंफोटेन्मेंट सिस्टम, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हीटीसह अनेक फीचर देण्यात आले आहेत.