मुंबई: अॅपल आयफोन 7बाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. या स्मार्टफोनचा नवा व्हिडिओ नुकताच लीक झाला होता. ज्यामध्ये 3.5mm ऑडिओ जॅकला नवी जागा देण्यात आली आहे. नव्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, अॅपल डिव्हाइसचं नवं नाव आयफोन 7 नाही तर आयफोन 6SE असणार आहे. कंपनी पुढील वर्षी आपला आयफोन 7 डिव्हाइस लाँच करणार आहे.

 

असेही वृत्त आहे की, नवा आयफोन  सप्टेंबरच्या 16 तारखेपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. एवान ब्लासने एक ट्वीट करुन याची माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन सप्टेंबरच्या 16 तारखेला लाँच करण्यात येईल.

 


या स्मार्टफोनबाबत याआधीही बरीच माहिती समोर आली होती. यामध्ये ड्युल कॅमेरा सेटअप असेल तर वॉटरप्रूफ आणि वायरलेस चार्जिंग असणार आहे.

 

अॅपल यावेळस आयफोनला A10 चिप आणि 32 जीबी 128 जीबी आणि 256 जीबीचे मॉडेल बाजारात आणू शकतं. मीडिया रिपोर्टनुसार या आयफोनमध्ये 12 मेगापिक्सल ड्युल कॅमेरा असू शकतो. तसंच 3 जीबी रॅमही असेल.

 

तसंच नव्या आयफोनमध्ये डार्क स्पेस ब्लॅक ऑप्शनही असण्याची शक्यता आहे. आयफोन लाँचिंग इव्हेंटची घोषणा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते.