VIDEO: पोकेमॉनच्या शोधात अनुष्का शर्मा, व्हिडिओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 27 Jul 2016 05:26 AM (IST)
मुंबई: 'पोकेमॉन गो' या मोबाइल गेमनं तरुणाईला अक्षरश: वेड लावलं आहे. आता याच गेमची नशा बॉलिवूडमधील सेलिब्रिटींवरही पाहायला मिळते आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मालाही या खेळाची भुरळ पडली आहे. अनुष्का शर्मानंही पोकेमॉन गो खेळण्याचा आनंद लुटला. इतकंच नव्हे तर हा गेम खेळत असतानाचा व्हिडिओही तिने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. VIDEO: एकीकडे जगभरात या गेमनं धुमाकूळ घालत असताना बॉलिवूडकर देखील आता या गेमच्या प्रेमात पडताना दिसत आहे. त्यामुळे या गेमची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. लाँच झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात हा गेमला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. हा गेम खेळताना काही जणांचे अपघातही झाले. पण तरीही हा गेम खेळण्याची त्यांची नशा काही कमी झालेली नाही. VIDEO: