मुंबई: मारुतीनं नव्या स्विफ्ट डिझायर स्केच जारी केलं आहे. भारतात या कारचं लाँचिंग 16 मे रोजी होणार आहे. नवी डिझायर अनेकदा टेस्टिंग दरम्यानही पाहायला मिळाली आहे. यामध्ये नवीन फीचरही पाहायला मिळू शकतात.


यामध्ये प्रोजेक्टर हेडलाईट आणि एलईडी डे-टाइम रनिंग लाइटसह इतरही फीचर असणार आहेत. नव्या डिझायरचा केबिन पहिल्यापेक्षा जास्त प्रीमियम असेल. यामध्ये अॅपल कार प्ले, अँड्रॉईड ऑटो आमि नेव्हिगेशन सपोर्ट करणारं सुझुकीचं स्मार्ट इंफोटेन्मेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि ब्लॅक बेज अपहोल्स्ट्रीसह अनेक फीचर असणार आहेत.


इंजिनबाबत अद्याप काहीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. यामध्ये 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.3 लीटर डिझेल इंजिन असण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सही असू शकतं.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या डिझायर कारची किंमत 5.35 लाख ते 8.57 लाख रुपये आहे. पण नव्या स्विफ्ट कारची किंमत यापेक्षा थोडी जास्त असण्याची शक्यता आहे.

सोर्स: कार देखो डॉट कॉम

Source: cardekho.com