नवी दिल्ली: वोडाफोनने सोमवारी आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर दिली आहे. त्यांच्या यूजर्सना आता 67% डेटा पॅक वापरण्याची संधी मिळणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी 650 रुपयांच्या डेटा पॅकवर 3जीबीचा 3G/4G चा डेटा मिळत होता. पण कंपनीने यात 67% वाढ केल्याने, आता याच किमतीत 5 जीबीचा डेटा पॅक मिळणार आहे.


 

याचप्रमाणे, 499 रुपयांच्या डेटा पॅकमध्ये 3G/4G साठी 50% अधिकचा डेटा मिळेल. म्हणजेच आता 499 मध्ये 2 जीबी ऐवजी 3 जीबी डेटा मिळणार आहे. तर 999 रुपयांमध्ये 3G/4G पॅकमध्ये 10 जीबीचा डेटा मिळेल. यामुळे ग्राहकांचा 54%फायदा होणार आहे.

 

वोडाफोन इंडियाचे संचालक संदीप कटारिया यांनी सांगितले की, ''आम्ही डेटा अधिकाधिक सुलभ आणि वापरण्या योग्य बनवत आहोत. या ऑफर ऑनलाईन यूजर्ससाठी मोठी परवणीच ठरणार आहेत.''