अद्याप देशात अशाप्रकारचं सरकारी ई वॉलेट कोणत्याही सरकारने आणलेलं नाही. त्यामुळे 'महा वॉलेट' हे देशातील पहिलंच सरकारी ई वॉलेट ठरणार आहे.
'महा वॉलेट'मध्ये पैसे पूर्णत: सुरक्षित असतील. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड यासारख्या कार्डच्या माध्यमातून पेमेंट करता येईल.
नोटाबंदीमुळे एटीएमबाहेर रांगा लागल्या आहेत. त्यामुळे बहुतेकजण आता कॅशलेस व्यवहार करत आहेत. सरकारकडूनही कॅशलेस व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यामुळे 'महा वॉलेट' सारखे ई-वॉलेट महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
पेटीएम
ऑनलाइन व्यवहारासाठी प्रसिद्ध असलेल्या पेटीएमच्या वापर आर्थिक व्यवहारांसाठी करता येऊ शकतो. दिवसाच्या कुठल्याही वेळी कुठूनही मनी ट्रान्सफर करण्यासाठी पेटीएमचा वापर करता येऊ शकतो. या वॉलेटद्वारे मोबाईल रिचार्ज, विविध बिलं, बस, रेल्वे, विमानाचं बुकिंग, सिनेमाचं तिकीट यासारखी आर्थिक देवाणघेवाण करणं सहज शक्य आहे.
पेटीएम कसे वापराल?
प्लेस्टोअरवरुन पेटीएम अॅप डाऊनलोड करा किंवा पेटीएम.कॉम या वेबसाईटला जा. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर रजिस्टर केल्यावर तुम्हाला वनटाईम पासवर्ड मिळेल. त्यानंतर होमपेजवर तुम्हाला मोबाईल प्रीपेड/पोस्टपेड, इलेक्ट्रिसिटी, डीटूएच, मूव्हीज, फ्लाईट, बस असे विविध पर्याय मिळतील.
पेटीएमच्या अकाऊण्टमध्ये पैसे कसे भराल?
1. होमपेजवर ‘अॅड मनी’ या पर्यायावर क्लिक करा
2. किती रुपयांचा बॅलन्स टाकायचा आहे, ती रक्कम निवडा
3. ‘अॅड मनी’ क्लिक करा
4. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग यापैकी तुम्हाला हवा तो पर्याय निवडा
5. आवश्यक ते डिटेल्स (कार्ड नंबर, सीव्हीसी इ.) टाका
6. ‘अॅड मनी’ वर क्लिक केल्यावर पेटीएममध्ये बॅलन्स जमा होईल.
संबंधित बातमी