मुंबई/नवी दिल्ली : रेल्वे प्रवासात तुम्ही आता ओळखपत्र म्हणून ‘एम आधार’ टीसीला दाखवू शकता. रेल्वे मंत्रालयाने ‘एम आधार’ ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यास मान्यता दिली आहे. ‘एम आधार’ हे आधार कार्डचं मोबाईल अॅप आहे.
आरक्षित श्रेणीतून प्रवास करताना आता ओळखपत्र म्हणून ‘एम आधार’ मान्य केलं जाईल. प्रवासी अॅपमध्ये केवळ पासवर्ड टाकून ‘एम आधार’ दाखवू शकतात, जे तुमचं ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल, असं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे.
‘एम आधार’ हे यूआयडीएआयचं मोबाईल अॅप आहे. प्ले स्टोअरवरुन हे अॅप तुम्ही डाऊनलोड करु शकता. तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला (मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक कसा कराल) असेल तरच हे अॅप तुम्हाला वापरता येईल. कारण तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल.
‘एम आधार’ कसं वापराल?
एम आधार हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरमध्ये जावं लागेल. डाऊनलोड झाल्यानंतर अॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करण्याचा पर्याय दिसेल.
फोटो : UIDAI
यामध्ये तुमचा पासवर्ड तयार केल्यानंतर आधार कार्डची पडताळणी करावी लागेल. बारकोड स्कॅन करुन किंवा आधार कार्ड नंबर टाकून ही पडताळणी तुम्ही करु शकता.
फोटो : UIDAI
आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर किंवा बारकोड स्कॅन झाल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी टाकल्यानंतर तुमचं 'एम आधार' तयार होईल.
रेल्वे प्रवासात आता 'एम आधार'च तुमचं ओळखपत्र!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Sep 2017 10:21 PM (IST)
आरक्षित श्रेणीतून प्रवास करताना आता ओळखपत्र म्हणून ‘एम आधार’ मान्य केलं जाईल. प्रवासी अॅपमध्ये केवळ पासवर्ड टाकून ‘एम आधार’ दाखवू शकतात.
फोटो : UIDAI
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -