मुंबई : अॅपलने आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X च्या लाँचिंगनंतर आयफोन 7 सह इतर फोन्सच्या किंमतींमध्ये मोठी कपात केली आहे. आयफोन 7 सीरिजमध्ये अॅपलने 7 हजार 200 रुपयांची कपात केली आहे.
जुन्या आयफोन्सपैकी आता आयफोन 7 सीरिज, आयफोन 6S आणि SE एवढेच फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतील. मंगळवारी आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X हे तीन फोन लाँच करण्यात आले. त्यानंतर कंपनीने आता वेबसाईटवर जुने फोन अपडेटेड किंमतीसह लिस्ट केले आहेत.
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस
आयफोन 7 प्लसचं 256GB व्हेरिएंट कंपनीने भारतात विक्रीसाठी बंद केलं आहे. आयफोन 7 च्या 32GB मॉडेलची किंमत 49 हजार रुपये, तर आयफोन 7 प्लसच्या 32GB मॉडेलची किंमत 59 हजार रुपये करण्यात आली आहे. तर आयफोन 7 च्या 128GB मॉडेलची किंमत 58 हजार रुपये आणि आयफोन 7 प्लसच्या 128GB मॉडेलची किंमत 68 हजार रुपये आहे.
आयफोन 6S
आयफोन 6S च्या 32GB मॉडेलची किंमत 40 हजार रुपये, तर आयफोन 6S प्लसच्या 32GB मॉडेलची किंमत 49 हजार रुपये असेल. आयफोन 6S च्या 128GB मॉडेलची किंमत 49 हजार रुपये, तर आयफोन 6S प्लसच्या 128GB मॉडेलची किंमत 58 हजार रुपये असेल.
आयफोन SE
आयफोन SE च्या 32GB मॉडेलची किंमत 26 हजार रुपये, तर या फोनच्या 128GB मॉडेलची किंमत 35 हजार रुपये आहे.
आयफोन X
अॅपलच्या या सर्वात स्पेशल फोनची किंमत 1 लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. भारतात या फोनच्या 256GB मॉडेलची किंमत 1 लाख 2 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. तर या फोनची सुरुवात 89 हजार रुपयांपासून होईल. 3 नोव्हेंबरपासून हा फोन भारतात उपलब्ध होईल.
आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस
29 सप्टेंबरला हे दोन्ही फोन भारतात लाँच होतील. आयफोन 8 च्या 64GB मॉडेलची किंमत 64 हजार रुपये असेल. तर या फोनच्या 256GB मॉडेलची किंमत 77 हजार रुपये असेल. आयफोनचं बेस मॉडेल यावेळी 64GB चं आहे. त्यामुळे या दोन्ही फोनच्या किंमतीची सुरुवात 64 हजार रुपयांपासून होईल.
PRICE CUT : आयफोन 7 च्या किंमतीत 7200 रुपयांची कपात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Sep 2017 05:50 PM (IST)
मंगळवारी आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X हे तीन फोन लाँच करण्यात आले. त्यानंतर कंपनीने आता वेबसाईटवर जुने फोन अपडेटेड किंमतीसह लिस्ट केले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -