नवी दिल्ली: अॅप्पलचा नवा आयफोन 7 येत्या सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे. आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस या दोन्ही नव्या स्मार्टफोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक देण्यात आले नाहीत. पण तरीही, ऑडिओ जॅक नसताना, तुम्ही इअरपॉड वापरू शकता. तसेच यामार्फत चार्जिंग पॉईंटशी कनेक्ट करता येणे शक्य आहे.

 

नुकताच या स्मार्टफोनचा नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इअरपॉडची झलक पाहायला मिळत असून, यामार्फत इअरपॉड कसे काम करेल हे सांगण्यात आले आहे.

 

या व्हिडीओमध्ये कितपत तथ्य आहे, याची पुष्टी आम्ही केली नाही. मात्र, अॅप्पलच्या या नव्या डिव्हाईसवरून एकापाठोपाठ एक रिपोर्ट लीक होत आहेत.

 



नुकत्याच एका रिपोर्टनुसार, अपकमिंग आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये 3GB रॅम देण्यात येणार आहे. तसेच यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल, वॉटरप्रुफ सोबतच वायरलेस चार्जिंगसारखी सुविधा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

तसेच या आयफोनमध्ये फोर्स टच होम बटन, नवी अॅन्टीना लाईन्ससारखे बदल करण्यात येणार आहेत. यासोबतच अॅप्पल यावेळी आयफोनला A 10 चिप आणि 32 GB, 128 GB आणि 256 GB सारखे मॉडेल बाजारात उतरवू शकते.

 

मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवल्यास, आयफोन 7 मध्ये 12 मेगापिक्सल ड्युअल कॅमेरासारखे उत्तम फिचर देण्यात आले आहे.